सामाजिक

क्रियाकलाप

 • समता , स्वातंत्र्य , बंधुभाव , सामाजिक , न्याय , श्रमप्रतिष्ठा , लोकशाही या मुद्यावर आधारित नवसमाज उभारणे . समाजाच्या विकासासाठी प्रचार प्रसार करणे . अत्याधुनिक सुविधांचा वापर करून समाज उपोयोगी योजना राबवणे .
 • राट्रीय एकात्मता , अंधश्रद्धा निर्मूलन , वैज्ञानिक दृष्टीकोन , जातिप्रथा निर्मूलन यासाठी प्रयत्न करणे .
 • गरीब गरजू , अनुसूचित जाती, जमाती, भटके बेठबिगार , भीक मागणारे इ. मुला मुलींसाठी वसतिगृह चालवणे त्यांच्यासाठी आश्रमशाळा सुरु करणे.
 • अपंग , अंध , मूक-बधिर मुलांसाठी आश्रमशाळा चालवणे . विधवा , परितक्त्या , निराधार , देवदासी , वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी आधारगृह चालवणे . गरीब गरजू अनाथ लहान मुलांसाठी संस्कार केंद्र , पाळणाघर सुरु करणे .
 • विविध सांस्कृतिक , शैक्षणिक संगीत, नृत्य , नाटक, चित्रपट , चित्रकला, हस्तकला विज्ञान प्रयोग , बौद्धिक क्षमता , शारीरिक क्षमता वाढवणेसाठी योगा , खेळ , कराटे , बॉक्सिंग , व्ययामशाला इत्यादींचे प्रशिक्षण सुरु करणे . त्यांना साहित्य उपलब्ध करून देणे . स्पर्धा आयोजन करणे त्यांना बक्षीसे सन्मान पत्र देणे.
 • कौटुंबिक साहाय्य सल्ला मार्गदर्शन केंद्र सुरु करणे . कायदेशीर कामगार नेमणे .
 • ग्रामीण , शहरी व आदिवासी मुलं मुलींना क्रीडा संकुल निर्माण करून देणे . देशी, विदेशी खेळांची आवड निर्माण करणे यासाठी प्रसार करणे व आयोजन करणे
 • व्यसन मुक्ती केंद्र सुरु करणे प्रचार प्रसार करून व्यसनमुक्त समाज निर्माण करणे .
 • हुंडाबंदी , बालकामगार, जातीयवाद इत्यादी सामाजिक कायद्याची जाणीव व जागृती करणे . वाधु-वर सूचक मंडळ चालवणे सामुदायिक विवाहाचे आयोजन करणे .
 • वृद्धांसाठी वृद्धाश्रम सुरु करणे. वरील सर्व योजनांसाठी राज्य शासनाच्या , केंद्र शासनाच्या योजने बाबत मार्गदर्शन करणे .
 • भ्रूणहत्या , स्त्रीभ्रूणहत्या , बालकामगार , अन्यायग्रस्ती स्त्री-पुरुष यांना कायदेशीर न्याय मिळवून देणे . महिलांना संघटित करून अन्याय अत्याचाराविरुद्ध कायदेशीर माहिती देणे .
 • भ्रस्टाचाराविरुद्ध जाणीव जागृती प्रसार प्रचार करणे.
 • नैसर्गिक आपत्ती ऊन , वारा , भूकंप , दुष्काळ ,पूर , अपघातग्रस्त व्यक्तींना मदत मिळवून देणे.
 • आदिवासी समाजाचा , मागास समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून स्वतंत्र योजना राबविणे .
 • समाजाच्या विकासासाठी सामाजिक संशोधन , सर्वेक्षण इत्यादी उपक्रम राबविणे . घरकाम करणाऱ्या , मजुरी करणाऱ्या महिलांना संघटित करून त्यांना स्वावलंबी बनवणे , अन्याय , अत्याचाराविरुद्ध लढा उभा करणे .
 • गरीब गरजुंसाठी मोफत अन्नछत्रालय सुरु करणे.
 • साक्षरता , संगणक साक्षरता अभियान राबवणे . थोर नेत्यांच्या पुण्यतिथी , जयंती इत्यादी कार्यक्रम राबवणे त्याकामी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना , संस्थांना सन्मानपत्र देवून गौरव करणे . त्यांना मानचिन्ह देणे थोर नेत्याच्या नावे सन्मानपत्र देणे.
 • वन व पर्यावरण याचे संगोपन करणे व नवीन संशोधित केलेल्या वृक्ष व वनस्पतींची लागवड करणे प्रशिक्षण देने . मुलामुलींसाठी वैज्ञानिक कार्यशाळा प्रशिक्षण सूरु करणे. संरक्षण क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या मुलामुलींसाठी स्वतंत्र प्रशिक्षण सुरु करणे . ऐतिहासिक वस्तूंचे, किल्ल्यांचे जतन करणे.

पत्ता

एम डब्लू एफ एन जी वो : न्यास
पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई .

कार्य

एम डब्लू एफ एन जी वो : न्यास
लातूर मराठवाडा महाराष्ट्र भारत.
ऑफिस नंबर: +९१ ९१३००४३९९९.

नेटवर्क

एम डब्लू एफ एन जी वो : न्यास
सामाजिक कार्यकर्ता | स्वयंसेवक | वर्ल्ड
ऑफिस नंबर: +९१ ९१३००४३९९९.

We Are Social