एम डब्लू एफ: एन जी वो (न्यास)
कार्य करितां सर्व सिद्धी
एम डब्लू एफ: एन जी वो (न्यास) सामाजिक काम करणारी संस्था असून २०१० पासून कार्यरत आहे, सामाजिकदृष्ट्या सर्व कार्यात सहभागी आहेत!
सुखियाझाला वृद्धाश्रम+
“ जगण्याची प्रेरणा ”
वृद्धांसाठी एक सुरक्षित आणि स्थिर जीवन प्रदान करण्याच्या हेतूने सुखियाझाला वृद्धाश्रम समूह कार्य करते. सुखियाझाला वृद्धाश्रम "घरापासून दूर" राहून वृद्ध व्यक्तींना रोजच्या जीवनातील अडचणींपासून मुक्त, सन्माननीय आणि सुरक्षित जीवन जगण्यास सक्षम करेल. आपलेही वृद्धाश्रमा असेल आणि आपणास मदतीची गरज असेल तर आपण समूहात सामील होवू शकतात
स्नेहांकुर अनाथाश्रम+
“अमुल्ल्य बालपण …”
या समूहातून प्रत्येक अनाथांना याची जाणीव होईल कि आपल्यासाठी कोणीतरी आहे जो काम करत आहे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करतो आहे. स्नेहांकुर अनाथाश्रमाने लहान मुलांसाठी शिक्षण, अन्नधान्य, वस्त्र पुरवण्याचा प्रयत्न केला आहे आणि स्नेहंकुरचे प्रेम दर्शविण्याचा प्रयत्न बराच उपक्रमात सहभागी होवून केला जाऊ शकतो. नक्कीच आपण समूहात सामील होऊ शकतात
VVRC-Education Hub
प्रत्येकासाठी शिक्षण
हे एक शैक्षणिक संस्था आहे, त्यामध्ये मुलांकरता प्रीस्कुल, स्कूल, कॉलेज, कोचिंग शिक्षणाची सोय केली जाणार आहे. आपण शिक्षण आणि मुलांबद्दल खूप भावनिकदृष्ट्या सक्षम आहात? भविष्यातील पिढीसाठी तरुण विचारांना आकार देण्यास आम्ही विश्वास पूर्वक काम करणार आहोत. मग आपल्यासाठी विमल विद्यापीठ आणि रिसर्च सेंटर सुरु करत आहोत
स्वराज्य स्वयंकसेवक समिती
"ध्येय विकसित विश्वाचे"
समाजातील प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे की इतरांना फुल न फुलाची पाकळी म्हणून सर्वाना सहकार्य करेल. सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या ठिकाणी काम करून आपणही खारीचा वाटा उचलून आपले योगदान दिले पाहिजे. आम्ही ग्रुपच्या गरजेवर लक्ष केंद्रित करतो. देशाने मला काय दिले आहे हे सांगणे कठीण, पण मी देशाला काय दिले तेही तेवढेच महत्त्वाचे! एवढेच काय, काय व्हायला हवे! हे समजून काम करयला हवे.
“वधू वर सूचक केंद्र/सेवा "
“ परिपूर्ण एक शोध…”
वधू वर सूचक केंद्र मंडळ येथे अनुरूप जोडीदार निवडला जातो. ऑनलाइन व ऑफलाइन लग्न जुळवणी केली जाते, सुरक्षित आणि तपासून माहिती घेऊनच प्रोफाईल घेतले आहेत. अजून बऱ्याच योजना व उपक्रम आहेत त्यातून सामाजिक कार्य ही होईल आणि समाजात आपले काही तरी योगदान हि घडेल. तुम्ही सहभागी होऊन कार्य करू शकतात.
माउली अन्नछत्रालय
“मायेचा स्पर्श”
अन्नाची दिवसेंदिवस नासाडी खूपच वाढली आहे, आपल्या इथेबरेच जन भुकेने याकूळ व काही मरतातही, म्हणूनच आपण हा उपक्रम हाती घेतला आहे या मध्ये अन्न दानाचे व उरलेलं अन्न पोहचवणे याची पूर्ण जबाबदारी घेवून काम करणार आहोत. आपणही कार्यात सहभागी होवून काम करू शकता.
Master Step:ज्ञान विज्ञान संस्कार
“ ऊर्जा , प्रेरणा स्त्रोत्र”
21 व्या शतकातील मुलांसाठी एक संपूर्ण नवीन मनाची गरज आहे! मस्तिष्कांची डाव्या बाजू आणि मेंदूची उजवी बाजू आहे. आज आपण ज्या स्पर्धात्मक जगात राहतो त्यामुले मेंदूची कौशल्ये माहिती असणे गरजेचे झाले आहे. आपली आंतरिक शक्ती किती महत्वाची आहे या शिक्षणातून मुलांना कळेल
संपादकीय वृत्तपत्र व मासीक
“ध्यास पर्वाचा …”
सार्वजनिकरित्या माहिती देण्यासाठी आमच्या कार्याचा एक भाग म्हणून, एम डब्लू एफ फाउंडेशन मॅगझीन . आमच्या क्षेत्राबद्दल, आमच्या कार्याबद्दल आणि आमच्या निष्कर्षांबद्दल माहिती प्रदान करते. आपण बरीच पुस्तके छापणार आहोत, डीजीटल बातम्या हि आपण aap द्वारे करणार आहोत.