दान : माऊली अन्न छात्रालय

दान : माउली अन्नछात्रालय मनुष्यप्राणी जेव्हा जीवनात केवळ स्वत:साठी झिजतो तेव्हा ते म्हटले जाते सामान्य जीवन. पण जेव्हा ‘देह होतो चंदनाचा’ म्हटले जाते, अर्थात मनुष्य आपल्या परोपकारी वृत्तीमुळे, कृतीमुळे सतत दुसऱ्याच्या कामी येतो तेव्हा ते असते असामान्य जीवन. खरे पाहता मनुष्यजीवनाची इमारत ही सत्कर्माच्या बळावरच उभी असते. ‘दान’ हेदेखील सत्कर्माचे एक उत्कृष्ट स्वरूपच आहे.

विविध उपक्रम:

अन्नदान, जलदान, वस्त्रदान, रक्तदान, भूदान, गो-दान, नेत्रदान, देहदान यांना स्थूल दान म्हटले जाते. शुभभावना, शुभकामना यांचा अंतर्भाव असलेले शांती व प्रेमाचे दान यास ‘सूक्ष्म दान’ म्हटले जाते. संपूर्ण विश्व हे माझे कुटुंब आहे या भावनेमुळे विश्वकल्याणाची निरंतर तळमळ त्यांना लागते ते या बहुमोल कार्यासाठी आपला बहुमोल समय प्रदान करतात त्याला ‘समयदान’ म्हटले जाते.
माणसांचं सुंदर, आकर्षक शरीर, त्याचं तारुण्य, त्याचं प्रशस्त निवासस्थान त्याची कमावलेली धनसंपदा यांपैकी शाश्वत, चिरंतन टिकेल असं काहीही नाही. त्यामुळे आपलं जीवन इतरांसाठी कसं मार्गदर्शक ठरू शकेल यावर लक्ष केंद्रित करावं व स्वत:चं व इतरांचं कल्याण साधण्याचा प्रयत्न करावा. सर्व जण यथाशक्ती दान करतातही, पण आपण केलेल्या दानाचा प्रभाव आपल्या जीवनावर कसा पडतो हे नेमके माहीत आहे का?
ईश्वरीय ज्ञानानुसार यथार्थ दान तेच असते ज्या दानाने देणार व घेणारा या दोहोंचाही जीवनचंद्रमा चढत्या कलेत प्रवेश करतो. थोडक्यात उभयतांचे जीवन सर्वकाळ सुखमय होते.
आपण एखादे पुस्तक वाचून त्यातील विचार साररूपाने आपल्या बुद्धीत सामावले आणि वेळोवेळी ते विचार इतरांपर्यंत पोहचवले. ज्ञानाचे दान काही केल्या कमी होत नाही. उलट वाढते. म्हणजेच ज्ञानदानात स्वहित व जनहित साधते. म्हणून अशा दानाला ‘महादान’ म्हटले जाते.
या ज्ञानाच्या बळावरच आपल्या जीवनाला दैवी गुणांनी व अष्ट शक्तींनी संपन्न करून आपल्या दिव्य आचरणाद्वारा आपल्या संगाच्या रंगात इतरांना रंगवणारे स्वत:बरोबरच इतरांची आध्यात्मिक, मानसिक, चरित्रिक उन्नती करवणारे गुण व शक्तींचे दान याला ‘वरदान’ म्हटले जाते. अशा व्यक्तींच्या सहवासामुळे अनेकांचे कवडीमोल जीवनदेखील हिरेतुल्य बनू शकते.
आपल्यामुळे अनेक आत्म्यांचे चरित्र उज्ज्वल बनेल त्यांचे कर्म व संस्कार सर्वश्रेष्ठ बनतील. त्यांच्यात संपूर्ण पवित्रतेची प्रतिष्ठापना होईल असे आपले आचरण असावे. म्हणूनच इतर दानांबरोबरच मनाद्वारा आत्मिक शक्तीच्या वृद्धीचे दान करा, वाचेद्वारा ज्ञानरत्नांचे दान करा व कर्माद्वारा सर्वही प्रकारच्या दैवी गुणांचे (देवतांसारखे) दान करा व अखंड महादानी व वरदानी बनण्याचा प्रयत्न करा.
दुसऱ्यांच्या व्यथेला, वेदनेला जाणून, संसाररूपी उन्हाने तप्त झालेल्या लोकांसाठी प्रेमरूपी, वात्सल्यरूपी सावली देणारं झाड जरूर बनावं. ही भावना केवळ संवेदनशील व्यक्तीच्या हृदयात उत्पन्न होते. त्या वेळी मनाला करुणतेचा स्पर्श होतो. त्यातून जी सेवा घडते तेच दानाचे प्रकट रूप होय.


  • खालील लिंकवर क्लिक करून अधिक माहिती घ्यावी
  • पत्ता

    एम डब्लू एफ एन जी वो : न्यास
    पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई .

    कार्य

    एम डब्लू एफ एन जी वो : न्यास
    लातूर मराठवाडा महाराष्ट्र भारत.
    ऑफिस नंबर: +९१ ९१३००४३९९९.

    नेटवर्क

    एम डब्लू एफ एन जी वो : न्यास
    सामाजिक कार्यकर्ता | स्वयंसेवक | वर्ल्ड
    ऑफिस नंबर: +९१ ९१३००४३९९९.

    We Are Social